Maha Food Bharti 2023 अन्न, नागरी पुरवठा विभागात “पुरवठा निरीक्षक, लिपिक” पदभरती सुरु, 345 पदांची नवीन जाहिरात
Purvatha nirikshak bharti 2023,Maha Food Bharti 2023
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत घटकांमधील संवर्ग, गट-क च्या एकूण 345 पदांच्या भरती करता आयबीपीएस मार्फत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क सरळ सेवा भरती 2023 घेण्यात येणार आहे.
Maha Food group C Vacancy Details 2023
अ.क्र. | संवर्ग | विभाग/ कार्यालय | एकूण पदे |
1 | पुरवठा निरीक्षक गट,क | कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर | 47 82 49 88 35 23 |
2 | उच्चस्तर लिपिक, गट-क | वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,मुंबई. | 21 |
Educational Qualification For Maharashtra Prisons Department Notification
शैक्षणिक पात्रता :-
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली पदवी.
2. परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
3. उमेदवार प्रस्तुत परीक्षा करिता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
4. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
5.संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिका वरील दिनांक हा शैक्षणिक अहर्ताधारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येईल.
Salary Details For Puravtha Nirikshak Bharti 2023
वेतन श्रेणी
पुरवठा निरीक्षक, गट क
S-10: रु.29200-9300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
उच्चस्तर लिपिक, गट क
S-8 :रु.25500-81100अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
Required Age Limit Maha Food Supply Officer Recruitment 2023
वयाची अट:-
किमान वय०१ डिसेंबर २०२३ रोजी 18 वर्षे पूर्ण असावी.
१. किमान वयोमर्यादा
खुला प्रवर्ग ३८
मागासवर्गीय / अनाथ ४३
२. प्रावीण्य प्राप्त खेळाडू
खुला प्रवर्ग ४३
मागासवर्गीय / अनाथ ४३
३.माजी सैनिक
खुला प्रवर्ग 38 + सेवा कालावधी+ 3 वर्ष
मागासवर्गीय / अनाथ 43 सेवा कालावधी+ 3 वर्ष
4. दिव्यांग 45
5. प्रकल्पग्रस्त 45
6. भूकंपग्रस्त 45
7. पदवीधर अंशकालीन उमेदवार 55
8. अनाथ 43
नोकरीचे ठिकाण
विभागीय कार्यालय,महाराष्ट्र
परीक्षेचे स्वरूप
1. इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल.
2. सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी मराठी उपलब्ध असेल.
3. विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता बारावीच्या दर्जाच्या समान राहील.
4. परीक्षेला सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व गणित विषय च्या प्रश्नपत्रिका चा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदी परीक्षेच्या दर्जाचा समान आहे.
5. 100 प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) राहतील, प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील. (एकूण गुण 200)
6. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील नमूद केलेल्या योग्य उत्तरांना गुण दिले जाते.
7. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
8. परीक्षेसाठी एकत्रितपणे 120 मिनिटांचा कालावधी राहील.
How To Apply For Maha Food Mega Bharti 2023
Procedure for Applying for Examination :- Steps for Submission of Application :-
परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत
1. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी http://mahafood.gov.in या लिंक वर जाऊन सविस्तरपणे जाहिरात वाचून नंतरच
आपला अर्ज भरावा.
2. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
3.आवश्यक असल्यास खाते अद्यावत करणे.
4. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
5. अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
6. उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in या लिंकवर किंवा 1800103 4566 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप:-
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
विषय प्रश्न संख्या गुण
मराठी 25 50
इंग्रजी 25 50
सामान्य ज्ञान 25 50
बौद्धिक चाचणी व
अंकगणित 25 50
एकूण गुण 200
Application Fees For Maha Food Lipik Bharti 2023
परीक्षा शुल्क:-
1.खुला प्रवर्ग 1000 रुपये
2. मागासवर्गीय/दिव्यांग/अनाथ 900 रुपये
3. माजी सैनिक परीक्षा शुल्क माफ
Maha Food Bharti 2023 – Important DatesPWD Bharti Hall Ticket Download महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 2023 , प्रवेशपत्र जाहीर
अर्ज सादर करण्याचा कालावधी
13 डिसेंबर 2023 रोजी 00:01 ते 31 डिसेंबर 2023 रोजी 23:59 पर्यंत
अधिकृत वेबसाईट:-http://mahafood.gov.in
येथे अर्ज सादर करा:-https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत
1. प्रोफाईल मध्ये केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना उमेदवारांना हस्तलिखित स्वयंघोषणापत्र व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्र अपलोड आवश्यकता नाही.
2. विविध सामाजिक व समानता आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची सदर परीक्षेच्या निकालानंतर अंतिम निवड झाल्यास उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
3. सदर कागदपत्रे प्रस्तुत जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 अभ्यासक्रम
मराठी 25 प्रश्न
सर्वसामान्य शब्दसंग्रह
वाक्यरचना
व्याकरण
म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी भाषा 25 प्रश्न
common Vocablary
Sentence Structure
Grammar
Use of idioms and Phrases and their meaning
Comprehensin Of Passage
सामान्य ज्ञान 25 प्रश्न
चालू घडामोडी- जागतिक दर्जाचे तसेच भारतातील
नागरिकशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन.
इतिहास- आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
भूगोल- महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,, नद्या, उद्योग धंदे, इत्यादी.
अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था, उत्पन्न,शेती,उद्योग, परकीय व्यापार,बँकिंग,लोकसंख्या,बेरोजगारी इत्यादी.
सामान्य विज्ञान
भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र,आरोग्यशास्त्र व इत्यादी.
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित 25 प्रश्न
बुद्धिमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आज आजमावण्यासाठी चे प्रश्न.
अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी.