vidyut sahayak bharti 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात
Vidyut sahayak Recruitment 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतन गट-4 मधील विभागस्तरीय सेवाजेष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अहर्ताप्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागण्यात येत आहे “विद्युत सहाय्यक” या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल, तरी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे.
MSEB VACANCY 2024
पदाचे नाव:-
विद्युत सहाय्यक
एकूण पदसंख्या :-5347
Educational Qualification For MSEB Bharti 2024
1)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहा अधिक दोन बंधामंदील माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
आणि
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी (वीजतंत्री/ तारतंत्री) अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री)अभ्यासक्रम प्रमाणपत्र
Age Limit For MSEB Bharti 2024
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिलक्षम राहील.
- दिव्यांग उमेदवारा कविता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
- माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
- महावितरण कंपनी मधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
- तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सुत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती/महापारेषण कंपनीमध्ये शिकवू उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी त्यांनी
- यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम आहे.
- खेळाडूसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
- अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमतेदार 5 वर्ष शितलक्षम राहील.
- एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपेक्षा एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास सवलतीपैकी अधिक उत्तम वयाची सवलत अनुज्ञ राहील.
- परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारासाठी विहित केलेली वयोमर्यादेची तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषा संदर्भात कोणतीही सूट/ सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांचा अराखीव (खुला)
- सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही .
- वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख जाहीर करण्यात येईल
Salary Details For MSEB Online Notification 2024
मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे प्रतिमहिना मानधन देण्यात येईल
मानधन | |
अ)प्रथम वर्ष -एकूण मानधन | रु 15000/- |
ब)दुसरे वर्ष – एकूण मानधन | रु 16000/- |
क)तिसरे वर्ष – एकूण मानधन | रु 17000/- |
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 मृदा जलसंधारण विभागात 670 पदांची भरती.
उपलब्ध मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर,व्यवसाय कर,इत्यादी वजावट करण्यात येईल भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्तीवेतनाची रक्कम निवृत्तीवेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.
“विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक रित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर रुपये 25880-505-28405-610-34505-710-50835 या वेतनश्रेणीमध्ये समावेश करण्यात येईल.
How To Apply For MSEB Vidyut sahayak Application 2024
- उमेदवाराची माहिती संगणक एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात यासोबत दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.त्याकरीता उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (Valid) स्वतःचा ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणी केलेला सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैद्य कार्यरत राहणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती,संपर्क कक्षेत इतर माहिती,शैक्षणिक अहर्ता इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.
- विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून आहे जाणे 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर निवेदन/ सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. सबब, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. उमेदवाराचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्वीकारले जातील अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची विशेष नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये नमूद केलेली विवरणे/बाबीच ग्राह्य धरण्यात येतील.अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती/ विवरणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांना ऑनलाइन तांत्रीक क्षमता चाचणी करीता स्वतंत्र पणे आवेदन पत्र पाठवण्यात येणार नाही. उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरून आवेदन पत्र डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये माहिती भरावयाची आहे. ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे,नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीच्या प्रवेशपत्र चाचणी केंद्राचा तपशील देण्यात येईल. चाचणी केंद्र कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असलेले उमेदवार नोंदणी झालेले नसल्यास सदस्य चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार नाही सदरच्या चाचणी केंद्राचे उमेदवार त्याचप्रमाणे चाचणी केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी झाल्यास उपलब्धतेनुसार नजीकच्या चाचणी केंद्रावर वर्ग करण्यात येतील. चाचणी केंद्रामध्ये बदल करण्याची उमेदवाराची मागणी स्वीकारल्या जाणार नाही.
- ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामध्ये सर्व माहितीची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पुरावा जसे की शैक्षणिक अहर्ता, तसेच जातीचा दाखला, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र,खेळाचे प्रमाणपत्र,प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त दाखला इत्यादी प्रमाणपत्राच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रति सिस्टीम जनरेट अर्जासोबत मागणी केल्यानंतर देणे क्रमप्राप्त आहे.अशा सादर केलेल्या अर्जाची छाननी नेमणूक देण्यापूर्वी अथवा त्यानंतर कोणतेही टप्प्यावर करण्यात येईल.
- अर्जामध्ये केलेला दावा व सादर केलेल्या कागदपत्रातील दावा यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती खोटी समजण्यात येईल.अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करून न शकल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
Job Location:-नोकरीचे ठिकाण
पूर्ण महाराष्ट्र
Fees:-चलान/फी
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी
- रु.250+GST
- मागासवर्गीय,आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारासाठी
- रु.125+GST
- उमेदवारांनी व दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग द्वारे भरायचे आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.
उमेदवारांना ऑनलाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते “ना परतावा” आहे.
- जाहिरातीतील नमूद दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्का व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बँक चार्जेस भरावी लागतील.
Important link For vidyut sahayak Bharti 2024
- ऑनलाइन अर्ज स्वीकृती करण्याची URL LINK कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल त्यासोबत ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.
- ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी(Online Exam) सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल.
Last Date Of Application:-अर्ज करण्याची शेवटची तारीख/दिनांक
लवकरच उपलब्ध होईल.
View Notification Advt:-जाहिरात बघण्यासाठी
Official Website:- अधिकृत संकेतस्थळ बघण्यासाठी
Online Apply:-ऑनलाइन अर्ज
लवकरच उपलब्ध होईल.